छत्रीस
जुनी छत्री
भेटले तिला आज अनेक दिवसांनी
अगदी घट्ट.
तिने जणू ठरवलंय
ती माझा happily ever after आहे.
तिच्या प्रत्येक वाकलेल्या तारेला
माझ्या मनासारखं वळण आहे.
ताणून बसवलेलं कापड
आता जुनं झालंय
चिवट आणि जबाबदार.
प्रत्येक ताडीच्या टोकाने
कधी ना कधी बंधन झुगारलंय.
आता प्रत्येक टोकाला
निरनिराळ्या रंगांच्या दोऱ्यांचे वळसे
वेगवेगळाल्या कोणी शिवलेले.
मध्यभागातली टोपी
मुकुटच जणू
कधीच उडून गेलेला
वा
उतरवून ठेवलेला.
पण कणा तसाच शाबूत
सारं पेलायची, बांधून ठेवायची कसरत.
office च्या घाईगडबडीत
भलताच tie बांधून जावा
तसा विजोड बसवलेला बंद
पण तरीही निऱ्या बद्ध करणारा.
खरंतर हे म्हणजे...
ship of theseus नाही का?
ठाऊक नाही.
पण ती हरवत नाही.
मी काळजी घेते म्हणून नाही.
असं वाटतं
तिने ठरवलंय
ती माझी असो वा नसो.
ती छत्री असो वा नसो.
मी तिची आहे
आणि ती माझा happily ever after आहे.
<3
जुनी छत्री
भेटले तिला आज अनेक दिवसांनी
अगदी घट्ट.
तिने जणू ठरवलंय
ती माझा happily ever after आहे.
तिच्या प्रत्येक वाकलेल्या तारेला
माझ्या मनासारखं वळण आहे.
ताणून बसवलेलं कापड
आता जुनं झालंय
चिवट आणि जबाबदार.
प्रत्येक ताडीच्या टोकाने
कधी ना कधी बंधन झुगारलंय.
आता प्रत्येक टोकाला
निरनिराळ्या रंगांच्या दोऱ्यांचे वळसे
वेगवेगळाल्या कोणी शिवलेले.
मध्यभागातली टोपी
मुकुटच जणू
कधीच उडून गेलेला
वा
उतरवून ठेवलेला.
पण कणा तसाच शाबूत
सारं पेलायची, बांधून ठेवायची कसरत.
office च्या घाईगडबडीत
भलताच tie बांधून जावा
तसा विजोड बसवलेला बंद
पण तरीही निऱ्या बद्ध करणारा.
खरंतर हे म्हणजे...
ship of theseus नाही का?
ठाऊक नाही.
पण ती हरवत नाही.
मी काळजी घेते म्हणून नाही.
असं वाटतं
तिने ठरवलंय
ती माझी असो वा नसो.
ती छत्री असो वा नसो.
मी तिची आहे
आणि ती माझा happily ever after आहे.
<3