माझी शामली आणि गंतव्य
माझी शामली
शामली ह्या नावाशी माझं काहीसं जुनं नातं आहे.
मी लहान असताना केबल टी व्ही नुकताच आला होता आमच्या घरी. तेव्हा मोजक्याच वाहिन्या पाहता यायच्या. तेव्हा एक मालिका लागायची--४०५ आनंदवन. अजूनही त्याचं शीर्षकगीत पाठ आहे मला. त्यामध्ये एक व्यक्तिरेखा होती "शामली" नावाची. साधी, भावनाशील, मर्यादाशील तरीही खंबीर, काहीशी गंभीर, आनंदी, प्रेम करणारी शामली. फार आवडायची मला. मी खूप लहान होते तेव्हा तरीही खूप लक्षात राहून गेलंय तिचं वागणं आणि वावरही.
त्यानंतर बऱ्याच वर्षांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे एक सखी भेटली. तीही बरीचशी अशीच होती. पण तिच्या अस्तित्वाला कायम एक दुखरी किनार असल्यासारखी होती. खूप जवळून अनुभवता आलं तिच्याबरोबर असणं. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं कि नाही साथ निभावता आली. घट्ट पकडून ठेवलेला हात कधी सुटून गेला कळलाच नाही. तिची मैत्री मला मात्र खट्टू करून गेली स्वतःबाबातच. ती वाऱ्याच्या आल्हाददायक झुळूकेसारखी आली आणि हुरहुरणारी जखम देऊन गेली.
त्यानंतर श्यामली भेटली ती पु ल देशपांड्यांच्या "मुक्काम शान्तिनिकेतन" मधून. मनात इतकं घट्ट घर केलं तिने कि मी पैसे जमताच प्रथम तिथे गेले. तिथे काम चालू होतं. श्यामली म्हणजे एक झोपडीच. उत्तरायण नावाच्या शान्तिनिकेतानाच्या फार शांत परिसरातली एक निरंतर शांत जागा. याची देही घेतलेला तो अनुभव याची डोळा कधीही जागा होतो. हि श्यामली जे देऊन गेली त्याचं वर्णन करणं हा मूर्खपणा किंवा अपराध ठरेल. पु ल नी सांगितल्याप्रमाणे ती एक विलक्षण अनुभूती आहे यात वाद नाही.
याच्या मध्ये एका चित्रपटात शामली भेटली होती "आजा नचले" नावाच्या. एका गावाचं नाव जिथे साहित्य-संगीत-कला याचा आदर केला जाई आणि मग पुनरुद्धारही. हिने मनाला फारसं हिंदोळवलं नसलं तरी तिचाही सबंध अशा आयुष्य उजळून टाकणाऱ्या चिरंतन गोष्टींशी होता हे मनात अधोरेखित होत राहिलं.
आज उगाच वाटलं कि काही गोष्टी लक्षात राहून जातात विनासायास, नकळत...
विचारांच्या अवर्तांचे खोल डोह भरत राहतात असेच काठोकाठ...
गंतव्य
आगगाडी किंवा बस म्हटलं कि पहिला विचार असतो तो थांब्याचा. कुठे चढायचं आणि कुठे उतरायचं हे निश्चित असतं.
प्रवासात हे थांबे पुढे सरकतंच राहतात आपण लक्षं द्या किंवा नका देऊ. आपला सबंध पुष्कळदा केवळ चढण्याच्या आणि उतरण्याच्या थांब्याखेरीज कशाशीही येत नाही. तरीही खिडकीतून डोकावून बघताना अनेक गोष्टी ओळखीच्या, सवयीच्या होवून जातात. त्यात होणारे बदल कधी जाणवतात कधी नाही.
आयुष्याची वाट जशी वळणं घेते तसे हे चढायचे आणि उतरायचे थांबे बदलत जातात. महाविद्यालयाच्या थांब्यावर शिक्षणानंतर उतरणं होतंच असं नाही. त्यानंतर पहिली नोकरी. तिचा थांबा वेगळा, चढायचा आणि उतरयाचाही. मग नोकरीनुसार हे थांबे असेच बदलत राहतात. सोयारीकीचाही ह्या थांब्यांच्या सततच्या बदलांवर परिणाम होतो. फार क्वचित एखाद्याच्या आयुष्याची वाट एकाच थांब्याभोवती घोटाळत राहते.
एकूण काय, थांबे बदलतंच राहतात. कधी प्रवासात दिसले तर अनेक आठवणींचे भ्रमर रुंजी घालतात पण तिथे फार काळ रेंगाळता येत नाही. आता दुसरी कुठेतरी पोचायचं असतं. त्या जुन्या गंतव्य स्थळाकडे बघून वाटतं कि बराच काळ आपला प्रवास इथेच संपायचा. आता दुसरी कुठेतरी संपतो. त्याही पलीकडे असाही विचार येतो कि काय हे सांप्रत गंतव्य कायमचं असेल कि तेही बदलेल.
आयुष्याच्या प्रवासाबरोबर बदलणारे थांबे आपलेसे करत मी वाट पाहत राहते अंतिम गन्तव्याची.

No comments:
Post a Comment