Saturday, 8 March 2014

अनुभूती

अनुभूती
बदलली जागा
साधे हे मानव्य
आनंदे परिमळे
सारा माळ

गीत पृथ्वीचे हे
गातात पाखरे
तयांना तरुंचे
अवगुंठन

मोकळे शिवार
वाचा ती नीरव
निसर्गचि मग
बोलू लागे

अनादी सामर्थ्य
खुले ठाकले जग
मनी सामावले
चराचर

No comments:

Post a Comment