Sunday, 20 December 2015

मरण

जायचंय मला मरणापलिकडे
पळून जायचंय
अशा अाकाशात जिथे असतिल रंग
पण त्यांत फरक करता येणार नाही

मला विहरायचंय अव्यक्तामधे
न बोलता न सांगता
कारण समजून घेण्याची गरज
केव्हाच संपलीय

मी कधीही न सोडलेल्या आशेनेच
आज निराशेचं दान घातलंय जणू
जगण्याचं कारणंच हिकावलं जाण्याची
भीती दाटल्येय

अाता खरंच संपणार का सगळं?
हाच अंत!
हेच मरण!?

No comments:

Post a Comment